कोबीची भाजी रेसिपी – Kobichi Bhaji Recipe in Marathi

कोबीची भाजी रेसिपी मराठीत
Kobichi Bhaji Recipe Marathi Madhe

कोबीची भाजी

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे. ” कोबी ” ह्या भाजी ला वेगवेगळ्या नावाने ओळखतात जसे पत्ताकोबी,गड्डा आणि कोबी.

घरा मध्ये सर्वांना आवडेल अशी तिखी आणि स्वादिष्ट कोबीची भाजी कसी करायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

Kobichi Bhaji Recipe Marathi ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमची पत्ता कोबी उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला कोबीची भाजी बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि कोबीची भाजी तुम्हाला नक्की आवडेल.भाजीत बटाटे आणि कांदे टाकले आहेत, हे पूर्णपणे वैकल्पिक आहे.

ह्या रेसिपी ची व्हिडियो पण आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर रेसिपी च्या शेवटी दिले आहे व्हिडियो ला नक्की बघा.

लागणारा वेळ : 45 मिनिट / वाढणी : ३ जन

कोबीची भाजी रेसिपी मराठी मध्ये .

साहित्य :

१) ५०० ग्राम कोबी. (धुवून चौरस आकाराचे कापलेले)

२) १ मध्यम आकाराचा बटाटा ( चौरस आकाराचे कापलेले )

३) १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेल )

४) ५० ग्राम वाटाणे ( १/२ वाटी )

५) कोथंबीर

६) ४-५ हिरवी मिरची (मध्यम आकाराची बारीक चिरून घेतलेली)

७) १ मध्यम आकाराचा टमाटा

८) १ टीस्पून हळद

९) १ टीस्पून गरम मसाला

१०) १ टीस्पूनहिंग

११) १/२ टेबलस्पून कसूरी मेथी

१2) १ टेबलस्पून धने पूड

१3) १ टीस्पून मोहरी.

१4) ४ टेबलस्पून तेल

कृती :

१) सर्वप्रथम मध्यम आचेवर कढईत तेल गरम करा.

२) तेल गरम झाल्यावर मोहरी, हिंग टाकून १ मिनीट परतून घ्या.

३) मग बटाटे टाका व २-३ मिनिटांसाठी परतून घ्या.

४) बटाटे परतून झाल्यावर हिरवी मिरची टाकून १ मिनीट परतून घ्या.

५) बारीक चिरलेला कांदा टाका व सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

६) कांदे परतून झाल्यावर वाटाणे टाका व २ मिनीट परतून घ्या.

७) चवीनुसार मीठ टाका मीक्ष करुन घ्या.

८) आता टमाटे टाका व मऊ होईपर्यंत परतून घ्या.

९) टमाटे परतून झाल्यावर मसाले व कसूरी मेथी टाकून मीक्ष करुन १ मिनीट परतून घ्या.

१०) मग आता कोबी टाका व व्यवस्थित मीक्ष करा.

११) मीक्ष झाल्यावर कढईला झाकून १०~१२ मिनिटांसाठी मध्यम आचेवर शिजवून घ्या.

१२) शिजवत असतांना भाजी ला थोड थोड्या वेळाने मीक्ष करुन घ्या म्हणजे भाजी व्यवस्थित सर्व्या बाजूने शिजेल.

१३) १०-१२ मिनिटांनंतर भाजी शिजल्यावर गेस बंध करा आणि कोथिंबीर टाकून मीक्ष करुन घ्या व १~२ मिनिटांसाठी झाकून ठेवा.

१४) १~२ मिनिटांनंतर कोबी ची भाजी खाण्यासाठी तयार आहे.

” जर तुम्हाला Kobichi Bhaji Marathi ची रेसीपी व्हिडियो बघायच असेल तर खालील दिलेली Youtube Channel ” माझं किचन ” वरील

कोबीची भाजी | Kobichi Bhaji Recipe in Marathi – कोबी बटाट्याची भाजी ” Video ला नक्की भेट घ्या . “

Kobi Bhaji Recipe Marathi

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.

Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा .

Home » कोबीची भाजी रेसिपी – Kobichi Bhaji Recipe in Marathi

Related Posts :

Leave a Comment