पाकातले रवा खोबराचे लाडू | Rava Khobrache Ladoo

Rava khobrache ladoo
Rava Khobrache Ladoo Recipe in Marathi

पाकातले रवा खोब्राचे लाडू

 नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये स्वादिष्ट रवा खोबराचे लाडू कसा करायचा याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

रवा खोबरे लाडू ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमचे लाडू उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला हे Rava Khobra Laddu बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि Rava Khobrache Ladoo Recipe In Marathi तुम्हाला नक्की आवडेल. हे बनवण्यामध्ये सोप आहे व हि लवकर बनते.

सणासुदीला घरी रवाचे लाडू नक्की बनतात. खास करून थंडीत वेगवेगळ्या प्रकारच्या लाडू आपण बनवत असतो.

त्या पैकी एक रवाचे लाडू जो आपण नक्की बनवतो. ह्या व्हिडिओ मध्ये वेगळा प्रकारच्या रवा लाडू केलाय. त्या मध्ये सुके खोबरे पण टाकले आहेत,

ज्याने लाडू खाण्यात जास्त कोरडे नही लागणारं, व ते रसाळ होईल आणि साखर न वापरता गुळचा साह्याने केलाय , रेसीपी खुप सोपी आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा.

पाकातले रवा खोब्राचे लाडू

साहित्य :

१) २ वाटी सुके खोबरे ( किसलेले ).

२) २ वाटी रवा.

३) गुळ. (गरजे नुसार)

४) वेलची पूड. (गरजे नुसार)

५) १ वाटी ड्रायफ्रूट चे पूड.

६) २ मोठे चमचे तूप.

कृती :

१) सर्वप्रथम मध्यम आचेवर कढईत तूप गरम करावे.

२) तूप गरम झाल्यावर रवा टाका व व्यवस्थित मीक्ष करुन ६~७ मिनीट परतून घ्या.

३) परतून झाल्यावर किसलेले खोबरे आणि गुळ टाका व मीक्ष करुन ड्रायफ्रूट चे पूड टाकून मीक्ष करुन घ्या.

४) व्यवस्थित मीक्ष झाल्यावर वेलची पूड टाकून मीक्ष करून १~२ मिनिटांसाठी परतून घ्या.

५) आता हे रवाचे मीश्रण लाडू बांधाण्यासाठी तयार आहे, लाडू बांधाण्यासाठी मीश्रणाला एका भांड्यात काढून घ्या फक्त १~२ मिनिटांसाठी थंड करून घ्या.

६) आता हाताला थोड तुप लावून मीश्रणाचे तुमच्या इच्छेच्या आकाराचे लाडू बांधूण घ्या.

७) असे तयार होतील स्वादिष्ट रवा खोबराचे लाडू.

” जर तुम्हाला रवा खोबराचे लाडू रेसीपी व्हिडियो बघायचे असेल तर खालील दिलेली Youtube Channel “ माझं किचन ” वरील ” पाकातले रवा खोबराचे लाडू | Pakatale Rava Khobrache Ladoo ” विडियो ला नक्की भेट घ्या .“

Rava Khobrache Ladoo

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा,

आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » पाकातले रवा खोबराचे लाडू | Rava Khobrache Ladoo

Related Posts :

Leave a Comment