
मासे फ्राय
नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे .आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये जसे तुम्ही बाजारात Fried Fish मिळतात तसाच स्वादिष्ट कुरकुरीत मसाला मासे फ्राय कसा करायचा याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.
Masala Fish Fry Recipe In Marathi ची संपूर्ण रेसीपीसोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे,
ज्या मुळे तुमचा मासे फ्राय उत्तम होईल अशी मला खात्री आहे.
ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला मच्छी फ्राय बनवण्यामध्ये मदद होईल.
मला आशा आहे कि कुरकुरीत मासे फ्राय तुम्हाला नक्की आवडेल. मासे म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या मासे च्या रेसिपी डोळ्यां समोर येत असतात,
तसच आमच्या घरी पण नक्की केलंय की आज मासे बनवायचे आहे, पण कुठली डिश बनवायची? हा प्रश्न, पण शेवटी ठरलं की मासे फ्राय बनवायला हवी.
म्हणून आईला सांगितलं की आज मासे कर आणि ते बनवताना सुरवातीला व्हिडिओ शुट करायचा राहिला म्हणून डायरेक्ट मेरीनेट नंतर च शुट झालंय त्या आधीच शुट राहिल.
तरी पण,तुम्हाला संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने दिली आहे ज्यामुळे तुमचे मासे फ्राय उत्कृष्ट होतील तर ह्या रेसिपी चा व्हिडियो पोस्ट च्या शेवटी दिल आहे.
साहित्य :
१) ७५० ग्राम एक काटी मासे.
२ ) १ टीस्पून हळद .
३) १ टीस्पून लाल तिखट.
४) १ टीस्पून धने पूड.
५) चवीनुसार मीठ.
६) १/२ टीस्पून हिंग.
७) लिंबू
कृती :
१) सर्वप्रथम मासे ना स्वच्छ साफ करून धुवून त्याला मेरीनेट करण्यासाठी जितके पण साहित्य दिलं आहे ( हळद,लाल तिखट,धने पूड,मीठ,हिंग,लिंबू) ह्याना मासे सोबत बराबर मीक्ष करुन मासे ना एक तासांसाठी बाऊल मध्ये झाकून ठेवावे.
२) १ तासा नंतर मासे तळण्यासाठी तवेत २ टेबलस्पून मध्यम आचेवर गरम करावे.
३) तेल गरम झाल्यावर एक एक करून मेरीनेट केलेल्या मासे टाका.
४) मासे ना ५~६ मिनिटांसाठी मध्यम आचेवर तळून घ्या.
५) ५~६ मिनिटां नंतर फिश ची वरच्या बाजूला पलटून ५~६ मिनिटांसाठी फ्राय करून घ्या.
६) दोघी बाजूने मच्छी फ्राय झाल्यावर शिजलेली असेल आणी कुरकुरीत पण झाले असतील तरी आपण तपासून घ्यायचे की शिजलेले आहे की नाही.
७) मासे शिजल्यावर खाण्यासाठी तयार आहे.
८) मासे खातं असताना लिंबूचा पिळून खालं तर जास्त स्वादिष्ट लागतील.
मासे फ्राय फोटो गेलेरी

” जर तुम्हाला फिश फ्राय ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली आमचे Youtube Channel ” माझंकिचन ” वरील ” मसाला मासे फ्राय | Masala Fish Fry Recipe in Marathi “ व्हिडियो ला नक्की भेट घ्या.
” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या
Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “
Related Posts :
- पालक वडी रेसिपी | Palak Vadi Recipe in Marathi
- शेंगदाणा चटणी रेसिपी – Shengdana Chutney Recipe in Marathi
- कांदा लसूण मसाला – Kanda Lasun Masala Recipe in Marathi
- बटाटा भजी | Batata Bhajiya Recipe in Marathi – बटाट्याची भजी रेसिपी
- तिळाचे लाडू ( Tilache Ladoo Recipe in Marathi ) – तिळगुळाचे लाडू
- कोबीची भाजी रेसिपी – Kobichi Bhaji Recipe in Marathi