Anda Methi Bhaji Recipe in Marathi | अंडा मेथी भाजी

Anda Methi Bhaji Recipe in Marathi | अंडा मेथी भाजी
अंडा मेथी भाजी

Anda Methi Bhaji

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . मेथी हि मोसमी भाजी आहे जे फक्त हिवाळ्यात खाल्ले जाते आणि खूप पौष्टिकही

आहे, तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये स्वादिष्ट Methi Anda Bhaji Recipe in Marathi कसी करायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

Methi Anda भाजी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमची अंडा मेथी भाजी उत्तम होईल

अशी मला खात्री आहे. ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला अंडा मेथी बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि Anda Methi Bhaji Recipe In Marathi तुम्हाला नक्की आवडेल. ह्या भाजी ला सामान्यतः रोटी, किंवा

पावभाजीचा पाव सोबत खाल्यास जास्त स्वादिष्ट लागेल.

नोंद : ह्या रेसीपी मध्ये अंडे बाफवुन भाजी बनवली आहे, कच्च्या अंड्या साठी पण हीच रेसिपी आहे फरक इतकाच कि जेव्हा ह्या रेसिपीत

बाफलेले अंडे टाकतात तेव्हा जर तुम्हाला कच्चे अंडे घालयचे असतील तर तुम्ही कच्चे अंडे सोडू शकतात.

साहित्य :

  1. १ जोडी मेथी ( जाळी किंवा बारीक तुमच्या सोयीप्रमाणे )
  2. ४ बारीक कापलेले कांदे
  3. ४ अंडे बाफूण बारीक कापून घेतलेले किंवा कच्चे अंडी ( सोयीप्रमाणे )
  4. ३-४ हिरवी मिरची
  5. ८-१० लसून ठेचलेल
  6. १/४ काळी मिरी पावडर
  7. ३-४ किसलेले ओले खोबरे
  8. चवीनुसार मीठ
  9. ३-४ टेबलस्पून तेल
  10. कोथिंबीर

Anda Methi Bhaji

कृती :

– कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात ठेचलेला लसून, थोडीशी कोथिंबीर, ३-४ हिरवी मिरची, १/२ टेबलस्पून हळद ,१ टीस्पून काळी

मिरी पावडर हे सर्व टाकून लसून लालसर करून घ्या.

– लसून परतून झाल्यास त्यात ४-५ बारीक कापलेला कांदा घालून त्यावर थोडेशे मीठ टाकून कढाईला झाकून कांद्याला कोमवून घ्या.

– आता ह्या मध्ये मेथी घाला व त्या सोबत किसलेला खोबरे घाला व्यवस्थित मिक्ष करून ४-५ मिनिट झाकून शिजवून घ्या.

– ४-५ मिनिट झाल्यावर कढईत एक एक करून बाफवुन घेतलेलं अंडे घाला किंवा जर तुम्हाला कच्चे अंडे घालायचे असतील तर ते घालून

व्यवस्थित मिक्ष करून झाकून ५-७ मिनिट शिजवून घ्या.

-मग तैयार आहे अंडा मेथी भाजी.

” जर तुम्हाला Anda Methi Bhaji ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Youtube Channel ” India Food

Network ” वरील ” How To Cook Anda Methi Bhaaji ( Eggs And Fenugreek Preparation) By Archana ” Video ला

नक्की भेट घ्या .“

Methi Anda Bhaji Recipe in Marathi

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Anda Methi Bhaji Recipe in Marathi | अंडा मेथी भाजी

Related Posts :

Leave a Comment