Chawli Bhaji | Chawli Bhaji Recipe Maharashtrian Style

Chawli Bhaji Recipe in Marathi :

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये झणझणीत गावरान चवली ची भाजी कसी करायची याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

चवळी ची भाजी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमची Chavali chi Bhaji उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

ह्या रेसीपी ला आपण Chawli Usal पण म्हणलं तरी चालेल व साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे.

ज्या मुळे तुम्हाला Chawli usal बनवण्यामध्ये मदद होईल. मला आशा आहे कि हि Chawli Bhaji रेसीपी तुम्हाला नक्की आवडेल.

आम्हाला ही भाजी आवडते आणि तो बर्‍याचदा घरी बनवली जाते. चवळी ला भारतीय घरात बनवले जातात, चवळी ला हिंदीमध्ये लोबिया, पंजाबीमध्ये रोंगी आणि इंग्रजीत Black Eyed Beans असेही म्हटले जाते.

शाकाहारी आहारासाठी, हा एक उत्तम प्रोटीन स्त्रोत मानला जातो. चवळी ची उसळ / Black Eyed Beans ही एक महाराष्ट्रीयन कृती आहे.

चवळी ची उसळ ला सामान्यतः भात आणि कोकम करी सोबत दुपारच्या जेवणासाठी उत्तम संयोजन आहे.

वेळ : ३० मिनिट | वाढणी : ४ जण ( Chawli chi Bhaji )

साहित्य :

 १) 1 टेबलस्पून तेल

२) मोहरी

३) जिरे

४) २ मोठे बारीक चीरलेल कांदा

५) १ लहान बारीक चीरलेल टोमेटो

६) आलं-लसून पेस्ट

७) धणे पावडर

८) १ टीस्पून गरम मसाला

९) १ टीस्पून लाल तिखट पावडर

१०) 1 कप रात्रीभर भिजवलेले चवळी 

११) 1 टेबलस्पून चमचा किसलेले ओले खोबरे 

१२) चवीनुसार गुळ

१३) पाणी

१४) चवीनुसार मीठ

१५) बारील चीरलेल कोथिंबीर

कृती :

– सर्वप्रथम रेसिपी बनवण्याचा एका रात्री पुर्वी एक कप चवळी ला स्वच्छ धुऊन रात्रभर भीजून ठेवा.

– कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी घाला ( मोहरी तळतळली पाहिजे ).

– जिरे घाला आणि त्यात कांदा घाला आणि साधारण -7 मिनिटांचा हलका सोनेरी रंग येईस्तोवर परतून घ्यावे.

– टमाटा, आले-लसूण पेस्ट, धणे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट घाला.

– मसाले चांगले मिक्स करावे आणि टमाटा ला सुमारे 4-5 मिनिटे कांद्या बरोबर एकजीव होईपर्यंत परतून घ्या.

– जर मसाले कोरडे पडत असतील किंवा जास्त प्रमाणात शिजलेले आढळले तर आपण मधून मधून थोडेसे पाणी घालू शकता.

– १ मोठा चमचा ओले खोबरे, चवी पुरता गूळ घालून मिक्स करावे.

– भाजी बनवण्यापूर्वी रात्रभर भिजवलेले चवळी ला कुकरमध्ये 3 शिट्ट्या पर्यंत शिजवून घ्या.

– शिजवलेल्या चवळी, एक कप पाणी आणि चवीनुसार मीठ घाला, चांगले मिसळुन घ्या.

– मग मध्यम आचेवर 5 – 6 मिनिटे कढई ला झाकून ठेवून उकळी येऊ द्या.

– 5-6 मिनिटानी उकळी आल्यावर झाकण काढून भाजीवरती कोथींबीर भूरभूरून मीक्ष करून घ्या .

– चवळी ची भाजी तयार झाली आहे. ह्या भाजी ला तुम्ही जर रोटी किंवा भाता सोबत जर खाल्ली तर अप्रतिम लागते.

” जर तुम्हाला Chawli Bhaji ची रेसीपी विडीओ बघायचे असेल तर खालील दिलेली Madhura Mam चे Youtube Channel ” Madhura’s Recipe ” वरील चवळी ची भाजी | Chawli Masala | Black Eye Peas Masala | Madhurasrecipe ला नक्की भेट घ्या . “

Chavalichi Bhaji

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा व Social Apps वरती पण नक्की शेयर करा and आमच्या

Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा . “

Home » Chawli Bhaji | Chawli Bhaji Recipe Maharashtrian Style

Related Posts :

Leave a Comment