कांदा लसूण मसाला – Kanda Lasun Masala Recipe in Marathi

कांदा लसून मसाला
Source : MadhurasRecipe Marathi

कांदा लसून मसाला रेसिपी

” नमस्कार तुमचे FoodMarathi मध्ये स्वागत आहे . तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये झणझणीत आणि स्वादिष्ट भाजी बनवण्यासाठी मसाला कसा बनवतात ते दिलं आहे,

हि रेसिपी चा स्रोत मधुरास रेसिपी आहे त्यांचा व्हिडियो अनुसरून विस्तृत पणे लिहल आहे .

कांदा लसूण कसा बनवायचा याची संपूर्ण उत्तम रेसीपी दिली आहे.

Kanda Lasun Masala ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे, ज्या मुळे तुमची कांदा लसूण मसाला उत्तम होईल अशी मला खात्री आहे.

ह्या रेसीपी चे साहित्य आणि कृती विस्तृत मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला कुठलेही भाजीला स्वादिष्ट झणझणीत बनवण्यामध्ये मदद होईल.

मला आशा आहे कि हि कांदा लसूण मसाला रेसिपी मराठी तुम्हाला नक्की आवडेल. ही बनवण्यामध्ये सोपी आहे व हि लवकर बनते.

ह्या रेसीपीत लगभज एक किलो कांदा लसूण मसालाची रेसिपी त्याचप्रमाणे त्याचे साहित्य दिले आहे.

कांदा लसूण मसाल्याला तुम्ही तुमच्या आवडीच्या भाजीत टाकू शकतात मसाल्या मुळे भाजी झणझणीत व स्वादिष्ट बनते, खास करून मांसाहारी भाजी अगदी स्वादिष्ट बनतात.

कांदा लसूण मसाला साहित्य:

1) धने ५० ग्राम.

2) सुखे खोबरे (किसून घेतलेलं.)२०० ग्राम

3) जिरं १० ग्राम

4) सहा जिरं १० ग्राम .

5) नागकेसर १० ग्राम

6) १० ग्राम मायपत्री.

7) ७~८ तमालपत्र.

8) १० ग्राम बदाम फुल.

9) लाल सुखी मिरची ५० ग्राम

10) ५० ग्राम बेडकी ( लवंगी )

11) २५० ग्राम कांदे. ( कांद्याला चिरून, १~२ दिवस उना मध्ये सुकवून घ्यायचा. )

• ५० ग्राम लसूण

•  १ टीस्पून हिंग.

कांदा लसूण मसाला

कृती :

1) सर्वप्रथम सुके मसालाना भाजून घ्यायचं आहे, त्यामध्ये पहिले धने ना भाजून घ्यावे. धने खरपूस होई पर्यंत भाजायचा आहे.

2) धने भाजून झाल्यावर त्याला दुसर्या भांड्यात काढून तिळ ला खरपूस रंग येई पर्यंत भाजून घ्यावे.

3) मग अश्याच प्रकारे जिरं ला भाजून घ्या, यानंतर शहा जिरे भाजून घ्या.

4) हे झाल्यावर सुके खोबरेला सोनरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

5) आता हे जितके मसाल्याना भाजले आहे त्याना मिक्षरात वाटून घ्या.

6) हे झाल्यावर राहिलेले मसाल्याना तळून घ्यावे,ज्यामध्ये सर्वप्रथम दालचिनी खरपूस तळून घ्या, नंतर मायपत्री तळा, मग बदाम फुल ला तळून घ्या.

7)मग लवंग तळा, यानंतर कळी मरी तळून घ्या.

8) अश्याच प्रकारे एक एक करून नागकेसर तळून घ्या मग ४ काळी वेलची तळा,ह्यानंतर हिंग तळा, मग तमालपत्र तळा.

9) आणि ह्यात चिरूनसुकवून घेतलेला कांद्याला तळून घ्या.

10) आता कांद्याला सोडून तळलेले मसाल्याना मिक्षरात वाटूण घ्यावे.

11) तळलेले मसाले वाटून झाल्यावर त्या मसाल्यात च भाजून वाटलेलं मसाला टाकून मिक्षरात फिरवून घ्यावे.

12) आता कांद्याला आणि लसूणाला मिक्षराचा भांड्यात जितका येईल तितका वाटूण घ्यावे.थोड थोड करून संपूर्ण कांद्याला आणि लसूणाला वाटूण घ्यावे.

13) कांदा आणि लसूणाला वाटूण झाल्यावर ह्यातच मध्येच दोघी वाटलेले मसाले ( भाजून वाटलेले आणि तळून वाटलेले मसाले )  टाकून एकदा फिरवून घ्यावे. 

14) फिरवून झाल्यावर ह्या संपूर्ण मसाल्याला एका भांड्यात काढून घ्या.

15) आता व्यवस्थित संभाळून सुके मिरची ला मिक्षरात वाटूण पूड बनवून घ्या, व त्याला वाटलेल्या मसाल्यात टाका.

16) अश्याच प्रकारे बेडकी मिरची ला वाटूण घ्यावे.

17) वाटूण झाल्यावर ह्या पूडाला पण वाटलेलं मसाल्यात टाकून संपूर्ण मसाल्याला मिक्ष करा.

18) मिक्ष झाल्यावर संपूर्ण मसाल्याला एकदा मिक्षरात फिरवून घ्यावे.

19) संपूर्ण मसाल्याला मिक्षरात फिरवून झाल्यावर कांदा लसूणाचा मसाला तयार होईल.

20) ह्या मसाल्याला आपण आपल्या आवडीचा भाजीत टाकून भाजीला स्वादिष्ट आणि झणझणीत बनते.

कांदा लसूण मसाला

” जर तुम्हाला Kanda Lasun Masala रेसिपी ची व्हिडियो बघायच असेल तर खालील दिलेली Youtube Channel वरील

कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala | MadhurasRecipe Marathi” Video ला नक्की भेट घ्या . “

Kanda Lasun Masala Recipe in Marathi

” जर तुम्हाला हि रेसीपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा.

Social Apps वरती पण नक्की शेयर करा And आमच्या Facebook Page ” FoodMarathi ” वरती नक्की भेट घ्या व Like / Follow करून आम्हाला Support करा .

Related Posts :

Leave a Comment