जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील शून्य ते सहा वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्रात प्रत्येक 1000 पुरुषांमागे 929 लिंग गुणोत्तर आहे, जे 2011 च्या जनगणनेनुसार देशभरातील सरासरी 940 पेक्षा कमी आहे. 2001 मध्ये महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे महिलांचे लिंग गुणोत्तर 922 होते. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 चौ. कि

महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर / स्त्री-पुरुष प्रमाण | Sex Ratio of Maharashtra

लिंग गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येतील दर १००० पुरुषांमागील असणारी स्त्रियांची संख्या होय.

लिंग गुणोत्तर = (स्त्रियांची संख्या/पुरुषांची संख्या) x १०००

२०११ च्या जनगणनेनुसार

भारतातील लिंग गुणोत्तर ९४३ आहे.





महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर | Child Sex Ratio of Maharashtra

० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये दर १००० मुलांमागे असणारे मुलींचे प्रमाण म्हणजे बाललिंगगुणोत्तर होय.

२०११ च्या जनगणनेनुसार

भारतातील बाल लिंग गुणोत्तर : ९१९

महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर : ८९४

महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांचे बाल लिंग गुणोत्तर राज्य स्तरावरील बाल लिंग गुणोत्तरापेक्षा अधिक आहे.

सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांपैकी चार जिल्हे (गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व भंडारा) हे विदर्भातील नागपूर विभागामधील आहेत.

सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर असणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यांपैकी दोन जिल्हे (बीड व औरंगाबाद) हे औरंगाबाद विभागातील / मराठवाड्यातील आहेत.


साक्षरता दर | Literacy Rate of Maharashtra

स्वातंत्र्यावेळी म्हणजेच १९४७ साली भारताचा साक्षरता दर केवळ १२ टक्के इतका होता.

२०११ च्या जनगणनेनुसार

भारतातील साक्षरता दर : ७४.०४%

महाराष्ट्रातील साक्षरता दर : ८२.३०%

महाराष्ट्रातील एकूण १७ जिल्ह्यांचा साक्षरता दर हा राज्य स्तरावरील साक्षरता दरापेक्षा अधिक आहे. नाशिक जिल्ह्याचा साक्षरता दर हा राज्य स्तरावरील साक्षरता दाराइतकाच आहे. सार्वधिक साक्षरता दर असणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यांपैकी नागपूर, अकोला व अमरावती हे तीन जिल्हे विदर्भातील आहेत. विद्येचे माहेरघर असलेले पुणे ८ व्या क्रमांकावर आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:33 ( 1 year ago) 5 Answer 3921 +22