भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? www.marathihelp.com

राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते.

काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 14:43 ( 1 year ago) 5 Answer 846 +22