भाषा म्हणजे काय भाषेचे स्वरूप स्पष्ट करा?www.marathihelp.com

प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं, ते माध्यम म्हणजे भाषा. त्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो.

भाषेचे स्वरूप - The nature of language

भाषा, ही अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे साधन, मौखिक भाषेत वाक्यांची, शब्दांची देवाण-घेवाण होते. पण अभिव्यक्तीसाठी काही अन्य युक्त्या प्रयुक्त्यांचाही वापर केला जातो. त्यासाठी अंगिक अभिनय खूप उपयोगी पडतो. हातवारे करणे, भुवयांच्या हालचाली करणे, भावनुकूल चेहरा बदलणे, डोळयांच्या खूणांनी भाव दर्शविणे, वेगवेगळया चिन्हांच्या साहाय्याने विचार प्रकट करणे ही सगळी अभिव्यक्तीची साधनेच असतात. अभिव्यक्तीची काही साधने माणसांबरोबरच प्राण्यांनीही अंगिकारलेली दिसतात. जंगलात जर साळुंक्या थव्याने ओरडायला लागल्या तर तिथे जवळपास साप आहे असे खेडयातील माणसे समजतात. आदिवासी समाजामध्ये ढोलाच्या साहाय्याने संदेशवहनाचे काम केले जात असे.


क्रोचे या भाषाशास्त्रज्ञाच्या मते, "भाषा अभिव्यक्तीच्या दृष्टीने उच्चारण व ठरावीक ध्वनींचे
संघटन होय. "

स्वीट नावाच्या भाषाशास्त्रज्ञानेही याच्या जवळचीच व्याख्या केली आहे. “ध्वनिमय शब्दाद्वारा विचारांचे प्रकटीकरण म्हणजेच भाषा होय."

वरील दोन्हीही व्याख्यांमध्ये ध्वनीला विचारांना महत्त्व आहे. निरर्थक ध्वनींना भाषेत स्थान नसते. त्यामुळेच भारतीय भाषा शास्त्रज्ञ सुकुमार सेन यांनी केलेली व्याख्याही वरील दोन व्याख्यांसारखीच आहे. ते म्हणतात, ''कंठाद्वारे निघालेला सार्थ ध्वनी समुच्चय म्हणजे भाषा होय.''

1. भाषेचे स्वरूप ध्वनिमय आहे.

2. ध्वनींना अर्थ असेल तरच अभिव्यक्ती योग्य होईल.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 3842 +22