मुंबई महानगरपालिका नगरसेवक किती?www.marathihelp.com

राज्यातील अन्य महापालिका, नगरपालिकांच्या पाठोपाठ मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईत आणखी नऊ वॉर्ड तयार करण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७वरून २३६ इतकी होणार आहे.
फेब्रुवारी २०२२ची मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता २३६ जागांसाठी होणार असल्याने आणखी रंगतदार ठरणार आहे.

लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण लक्षात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या २३६ अशी करण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली.

दरम्यान, याआधी २७ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाने महापालिका आणि नगरपालिका सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकेच्या सदस्य संख्येत १७ टक्के वाढ होणार आहे.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 358 +22