वैदिक पद्धतीने लग्न म्हणजे काय?www.marathihelp.com

हिन्दू विवाह भोगाचे साधन नाही, एक धार्मिक-संस्कार आहे. संस्काराने अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणाने दांपत्य जीवन आनंदात पार पडतं.
 
1.ब्रह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात वैदिक रीती आणि नियम पाळले जातात. हे उत्तम विवाह आहे.

2.देव विवाह : एखाद्या धार्मिक कार्य या उद्देश्याने किंवा मूल्य रूपात आपली कन्या एखाद्या विशेष वराला सोपवणे याला 'देव विवाह' असे म्हणतात. परंतू या विवाहात कन्येच्या इच्छेकडे दुर्लक्ष केलं जातं. हा मध्यम विवाह आहे.
 
3.आर्श विवाह : कन्या-पक्षाला कन्येचे मूल्य चुकवून (सामान्यतः गो दान करून) कन्येशी विवाह करणे याला 'अर्श विवाह' असे म्हणतात. हा मध्यम विवाह आहे.
 
4.प्रजापत्य विवाह : कन्येची संमती घेतल्याविना पालकाद्वारे तिचा विवाह अभिजात्य वर्गाच्या (धनवान आणि प्रतिष्ठित) वरासोबत करणे याला 'प्रजापत्य विवाह' असे म्हणतात.
 
5.गंधर्व विवाह : या विवाहाचे वर्तमान स्वरूप म्हणजे प्रेम विवाह. कुटुंबाच्या समंतीविना वर आणि कन्या यांच्याद्वारे विधीशिवाय आपसात विवाह करणे याला 'गंधर्व विवाह' असे म्हणतात. वर्तमानात हे केवळ यौन आकर्षण आणि धन तृप्ती या हेतूने केलं जातं आणि याला प्रेम विवाह असे नाव दिलं जातं.
 
6. असुर विवाह : कन्येला खरेदी करून (आर्थिक रूपाने) विवाह करणे याला 'असुर विवाह' असे म्हणतात.
 
7.राक्षस विवाह : कन्येच्या संमतीविना तिचे अपहरण करून बळजबरी विवाह करणे याला 'राक्षस विवाह' असे म्हणतात.
 
8.पैशाच विवाह : गुंगीत असलेल्या कन्येचा (गहन निद्रा, मानसिक कमजोरी इत्यादी) लाभ घेत तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित करणे आणि तिच्यासोबत विवाह करणे याला 'पैशाच विवाह' असे म्हणतात.
 
या आठ प्रकारांच्या विवाहातून केवळ ब्रह्म विवाहाला मान्यता आहे बाकीचे विवाह धर्म संमत मानले गेले नाही. तरी पण यातून देव विवाहाला प्राचीन काळात मान्यता प्राप्त होती.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 5913 +22