२५ सप्टेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने किती उद्दिष्टे स्वीकारली?www.marathihelp.com

२०१५ला या संघटनेला ७० वर्ष पूर्ण झाले.
राष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, त्याचे हेतू व उद्दिष्टे काय आहेत हे राष्ट्रसंघाच्या घटनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांची

प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-
जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे
राष्ट्राराष्ट्रांत मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे.
आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे.
राष्ट्रसंघातील सर्व राष्ट्रे सार्वभौम व स्वतंत्र आहेत आणि त्यांनी सामुदायिक सुरक्षिततेसाठी राष्ट्रसंघाचे नियम पाळावेत.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे. ांतता प्रस्थापित करणे.

संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे व तत्त्वे : सनदेच्या पहिल्या कलमातच संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे विशद केलेली आहेत. ती अशी :
(१) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे.

(२) राष्ट्राराष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.

(३)आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करून त्याव्दारे राष्ट्राराष्ट्रांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व मानवी समस्यांची उकल करणे तसेच वंश, लिंग, भाषा व धर्म यांच्या आधारे भेदभाव न करता मानवी हक्क व मूलभूत हक्क यांची जोपासना करून त्यांबाबत आदरभाव वाढविणे.

(४) ही समान उद्दिष्टे गाठण्यासाठी विविध देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये सुसंवाद साधणारे केंद्र म्हणून कार्य करणे.

वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सदस्य-राष्ट्रांनी कोणत्या तत्त्वांच्या आधारे कार्य करावे, याचे मार्गदर्शन सनदेच्या दुसऱ्या कलमात केलेले आहे. ही आधारभूत तत्त्वे पुढीलप्रमाणे : (१) सर्व राष्ट्रे सार्वभौम व समान आहेत. (२) सनदेनुसार येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे बंधन सर्व सदस्य-राष्ट्रांवर आहे. (३) आंतरराष्ट्रीय संघर्षांची शांततामय मार्गाने सोडवणूक करणे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता व न्याय यांना धोका निर्माण होणार नाही. (४) आंतरराष्ट्रीय संबंधांत कोणत्याही राष्ट्राची भौगोलिक अखंडता व राजकीय स्वातंत्र्य यांविरूद्ध बळाचा प्रयोग करण्याची धमकी किंवा प्रत्यक्ष वापर करण्यास सदस्य-राष्ट्रांना प्रतिबंध. (५) संयुक्त राष्ट्रांच्या कार्यांत सर्व सदस्य-राष्ट्रांचे सहकार्य. (६) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेसाठी बिगर-सदस्य राष्ट्रांकडूनही या तत्त्वांशी सुसंगत वर्तन व्हावे म्हणून प्रयत्न. (७) कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध. आंतरराष्ट्रीय संबंधांचे लवचिक आणि प्रवाही स्वरूप व उद्दिष्टपूर्तीसाठी संघटित प्रयत्न यांची सांगड या आधारभूत तत्त्वांमध्ये घातलेली दिसून येते.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 910 +22