Ukhane | Marathi Ukhane for Female | Navriche Ukhane

लग्नाचा सिजनमध्ये महाराष्ट्रात Marathi Ukhane घेण्याची खूप जुनी प्रथा बर आणि ते घेतल्या शिवाय चालत पण नाही.

लग्ना मध्ये उखाणे घेणाच्या क्षण हा खूप आनंदाचा व अविस्मरणीय असतो पण Ukhane हे जितके सोपें व एकण्या मध्ये

आनंद देणारे, संस्कार , आदरभाव दाखविणारे असतात तितकेच सर्वाना आवडतात.

आज मी तुम्हाला या पोस्ट मध्ये नवरीचे उखाणे दाखविणार आहे, एकूण ४०+ Navriche Ukhane देईन,

हे उखाणे बोलण्या मध्ये सोपें तर असतील ज पण एकण्यात आनंदी, आदरभाव दाखवितील , प्रेम दाखवितील .

Ukhana

marathi ukhane, ukhane marathi, marathi ukhane for female
Ukhane Marathi

आम्ही नवरदेवाचे ( Ukhane in Marathi for Male ) पण उखाणे पोस्ट केले आहेत, आणि ते पण सोपें , प्रेमळ , ऐक्याला आनंदी ,

आदरभाव दाखविणारी आहेत, तुम्हाला नक्की आवडेल .

आम्ही तस तर स्वयंपाकाच्या रेसीपी टाकतोय पण रेसीपी तर भरपूर टाकले होते , आणी मग विचार झाला कि का नाही

Lagnatil Ukhane टाकावे , म्हणून तुम्ह्च्या साठी आणले आहे ह्या पोस्ट मध्ये Marathi Ukhane

जे तुम्हाला नक्की आवडतील .

Marathi Ukhane :

1. चिवड्यात घालतात खोब्र्याचे काप,
…. रावा समवेत ओलांडते माप

2. सोन्याचा अंगठीवर नागाची खुन,
… रावांचे नाव घेते … ची सुन.

3. कामाची सुरवात होते श्री गणेशापासून
… रावांचे नाव घेण्यास , सुरवात केली आजपासून.

4. साजूक तुपात नाजूक चमचा
… रावांचे नाव घेते, आशीर्वाद असू द्या तुमचा.

5. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
… रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

६. रिमझीम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात
… रावांचे नाव घेते असू द्या लक्षात.

७. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून,
… रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.

८. जेजुरी चा खंडोबा, तुळजापुरची भवानी,
… रावांची मी आहे अर्धागिनी

९. पौर्णिमा मे च्या दिवस चंद्राला लागते चाहूल,
… रावांचे जीवणात, टाकते मी पहिले पाऊल.

१०. श्रीकृष्णाने लिहिली भगवत गीता ,
… राव माझे राम आणी मी त्यांची सीता.

११. विरहपाठ वाढविणारा अंतरपाठ आला क्षणात झाला दूर ,
… आणी … च्या संसारात ऐकू येतील फक्त प्रेम सनई चे सूर.

१२. पती पत्नीचे नाते म्हणजे फुले अंबोलीची,
… च्या नावाला जोड मिळाली … च्या नावाची.

१३. दारा पुढे रांगोळी काढली फुलांची,
… चे नाव घेते , नव सून …( कुळ ) ची .

१४. नाव घे, नाव घे, आग्रह कशाचा,
… रावांचे नाव ओठात, प्रश्न असतो उखानण्याचा.

१५. शब्दांवाचून कढले सारे शब्दांच्या पलीकडले,
… च्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाले आले.

Ukhane in Marathi

१६. …(कूळ) लाडकी लेक झाली देशमुखांची सुन,
… रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून.

१७. कळी उमळली खुदकन हासली, स्पर्श झाला वाय्राचा,
… रावांचे नाव घेते, असवा आर्शीवाद सर्वांचा.

१८. नेत्र्यांच्या निरंजनी अश्रुंच्या वाती
… साठी सोडली माझ्या माहेरची नाती.

१९. जिथे सुख शांती समाधान, तिथे लक्ष्मीचा वास,
… रावांना भरविते श्रीखंडाचा घास.

२०. रूसलेल्या राधेला क्रृष्ण म्हणतो हास
… रावांना मी भरविते प्रेमाचा घास.

२१. तेवाच्या दिवेला तुपेची वात,
… रावांचे नाव घेउन करते संसाराला सुरवात.

२२. हजार रूपये ठेवले चांदीच्या वाटीत,
… रावांचे नाव घेते लग्नाचा वरातीत.

२३. एका वाफ्यातील तुळस दुसर्या वाफेत रूजली,
… सर्वांची सारे माणसे मी आपली माणली.

२४. सोन्याचा अंगठीवर प्रेमांची खुण,
… रावांचे नाव घेते ” पाटलांची ” मी  सुन.

२५. काढ्यात काढा पाटणकर काढा,
… रावांचे नाव घेते सगळ्यांनी
शंभर शंभर रूपये काढा.

२६. अबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना,
… रावांचे नाव द्यायला शब्द पुरेना.

२७. सासुबाई माझ्या प्रेमळ जाउबाई आहेत हौशी,
… रावांचे नाव घेते सत्यनारायणाचा दिवशी.

२८. देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश,
… रावांचे नाव घेउन करते गृहप्रवेश.

२९. अनेकांनी लिहीले काव्य, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती. आज झाले … रावांची सौभाग्यवती.

३०. झाले सत्यनारायण पुजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
… राव सुखी राहो हीस आश मनाची.

Marathi Ukhane for Female

३१. सासरचे निरांजन,माहेरची फुलवाल,
… रांवासोबत करते नवीन आयुष्याची सुरुवात.

३२. जाईजुईचा फुलांचा दरवळतो सुगंध,
… रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद.

३३. शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाउमाता,
… रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता.

३४. सासरचे कौतूकात राहील नाही काळाच भान,
… रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान.

३५. प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
… रावांचे नाव घेउन सोडले काकण.

३६. आजच्या सोहळ्यात थाट केलाय खास,
… रावांना भरविते जिलेबीचा घास.

३७. मंगळसुत्रातील दोन वाट्या सासल आणि माहेर,
… रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.

३८. इन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा पावसात असतो उन,
… रावांचे नाव घेते… ची मी सुन.

३९. सोन्याची अंगठी रूप्याचे पैंजण,
… रावांचे नाव घेते ऐका सारेजण.

४०. लग्नाचा पंगतीत केलीय फुलांची आरास,
… रावांचे नाव घेण्यास आजपासून करते सुरवात.

४१. मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
… रावांचा संसार हा सुखाचा कळस.

४२. आकाशाचा अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
… रावांचे जोडीने संसारात टाकते पाउल.

४३. मानसरोवात राजहंस मोती भक्षी,
… राव आणि माझ्या विवाहाला अग्णीनारायण साक्षी.

४४. मटणाच्या रस्सा केला वाटण घालून घोटूण,
… राव बसले रसून मग मीच खाल्ला चाटूण पुसून.

Navriche Ukhane

तर हे होते Ukhane in Marathi मला आशा आहे कि तुम्हाला हे उखाणे नक्की आवडले असतील ,मी माझ्या क्षमते प्रमाणे

४० पेक्षा जास्त नवरीचे उखाणे देण्यास प्रयत्न केला आहे , मी अजून नवीन Marathi Ukhane पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन .

तुम्हाला ह्या Marathi Ukhane List मध्ये कोणते Ukhana आवडले नक्की कॉमेंट करून सांगा .आणि आम्ही रेसिपी

टाकतो आम्हच्या ह्या FoodMarathi Website वर ते तुम्ही नक्की बघा .

नमस्कार !

Home » Ukhane | Marathi Ukhane for Female | Navriche Ukhane

Related Posts :

Leave a Comment